|| हितगुंज ||​

आत्मज लेवा पाटीदार माता भगिनी व बंधुंनो, आपल्या हाती ही विवाहेच्छुक वधू-वरांची परिचय पुस्तिका देतांना खरोखरच मनःस्वी आनंद होतो आहे. आजच्या या धावपळीच्या युगात माझ्या या समाजबांधवांची पुस्तिकेच्या रूपाने का होईना ही समाजसेवा घडली हे आमच्या लेवा नवयुवक संघाची पुण्याई आहे.

सदरहु पुस्तिका देतांना आम्ही जास्तीतजास्त संख्येने विवाहेच्छुक वधू-वर इच्छकांची नावे देण्याचा प्रयत्न केला आहे. बिनचुक पुस्तिका तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. सर्वाना पुरेल व केव्हा ही पुस्तिका मिळेल, असाही विचार केला आहे. किंमतही कमीतकमी ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. माहिती संकलित करणे खरोखर जिकीरीचे आहे. २८० नोंदणी अर्ज जमाकरण्याचे केंद्र (फॉर्म कलेक्शन सेंटर) व २२ सूची विक्री केंद्र महाराष्ट्रात आहेत तसेच अन्य राज्यात राहणाऱ्या बांधवाना सुची पोहचविण्याचे कार्य सदैव सुरू आहे. विवाहेच्छुक वधू-वरांची माहिती लिहून दिल्याप्रमाणे आपल्या या पुस्तिकेत छापलेली आहे. त्यामुळे या पुस्तिकेत दिलेली माहिती खरी का खोटी याची पडताळणी गरजूंनी स्वतः करायची आहे. याबाबत लेवा नवयुवक संघ जवाबदार राहणार नाही.

ह्यावर्षीही आम्ही विवाहेच्छुक वधू-वरांची पुस्तिका छापणार असून डिग्रीवाईज व वयवाईज वर्गीकरण केलेली असल्याने ही पुस्तिका हाताळताना तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही ह्याची काळजी आम्ही घेतली आहे. संकलित माहिती वधू व वरांसाठी स्वतंत्र पुस्तिकेत देतांना आम्ही कॉम्प्युटर प्रिंटींगची मदत घेऊन बिनचूक देण्याचा प्रयत्न केला आहे. अनवधानाने तांत्रिक बाबीमुळे काही चुका झाल्यास आमची चूक पोटात घ्यावी. समाज बांधवांची 'गुडविल' आमच्या पाठीशी आहेच व ती जास्त प्रमाणात आपण जोपासावी.

आपला समाज अद्यापही व्यापार आणि उद्योजक प्रगतीपथावर आहे. शेतकरी वरां विषयी विवाहेच्छुक वधूंनी सकारात्मक विचार करावा. ह्या पुस्तिकेत व्यावसायिक तसेच शेतकरी व अल्पशिक्षितांच्या परिचयाचा ही समावेश आहे.

सर्वेः सुखिनः सन्तु | सर्वे सुखिनः निरामयः |

सर्व विवाहेच्छुक वधू-वरांना मनाजोगा जोडीदार मिळावा व पालकांनाही आवडी निवडीनुसार जावई - सून मिळावी ही हार्दिक शुभेच्छा |


स्नेहांकित
लक्ष्मीकांत तुकाराम चौधरी
अध्यक्ष
लेवा नवयुवक संघ, जळगाव