Terms and Conditions
नियम अटी व सुचना

  या पोर्टल आणि अॅप वर फक्त लेवा पाटीदार समाजबांधवांनीच नोंदणी करायची आहे आणि नोंदणी अर्जात सर्व माहिती भरणे आवश्यक आहे.

  १. माहिती पत्रक वधू-वराने किंवा जबाबदार पालकांनी आणि त्यांच्या आई-वडिलांनी भरायचे आहे.

  २. नोंदणी अर्ज वधू-वर संबंधीची संपूर्ण, आवश्यक आणि खरी माहिती भरून द्यावी. आवश्यक माहिती अपूर्ण असल्यास नोंदणी अर्ज स्वीकारले जाणार नाही व सुची पुस्तकात आणि डिजिटल सूची वधू-वराचे नाव नोंदविले जाणार नाही कृपया याची नोंद घ्यावी.

  ३. वधू/वरांना १ फोटो दाखविण्याची सुविधा असून १ फोटो प्रिंटिंग सूचीकरिता आणि डिजिटल सूचीकरिता असून फोटो स्वत:च्या जबाबदारीवरच टाकावे.

  ४. नोंदणी अर्जात अविवाहित / घटस्फोटीत / विधवा / विधुर / अपंग वैगेरेचा सविस्तर उल्लेख गरजेचा आहे.

  ५. विवाहेच्छुक वधू-वर परिचय सूचीमध्ये देणे किंवा असलेली नोंदणी अर्जची माहिती पडताळणे व त्या माहितीच्या आधारे घेतलेल्या निर्णयाची संपूर्ण जबाबदारी ही संबंधित वर/वधू व त्यांच्या पालकांची आणि आई-वडिलांची असेल त्याला लेवा नवयुवक संघ कोणत्याही परिस्थितीत जबाबदार राहणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी.

  ६. विवाहेच्छुक वधू-वरांनी विशेषत: माहिती भरतांना त्यांचे शिक्षण, व्यवसाय, नोकरी, नोकरीचे ठिकाण, पत्ता व मासिक उत्पन्न भरणे आवश्यक राहील.

  ७. संपर्कासाठी आपण २ ओळखीच्या व्यक्तींचे नावे देऊ शकता. संपर्कासाठी नाव देतांना त्या व्यक्तीची संमती घेऊनच पूर्ण माहिती भरावी.

  ८. वेबसाइट वर कोणालाही सविस्तर माहिती बघता येणार नाही त्याकरिता लेवा नवयुवक संघ हे अॅप गूगल प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करावे आणि योग्य ती अर्जची माहिती भरून पेमेंट करावे मग तुम्ही वधू किंवा वरांची दिलेली संपूर्ण माहिती पाहू शकतात.

  ९. कोणत्याही परिस्थितीत नोंदणी फी परत किंवा रिफंड होणार नाही.

  १०. काही कारणामूळे पेमेंट संबंधी अडचण आल्यास कार्यालयीन कामाच्या वेळेस सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल.

  ११. नोंदणी अर्जातमध्ये दिलेली माहिती दाखविणे किंवा न दाखविणे या संबंधीचे सर्व अधिकार लेवा नवयुवक संघाकडे राहतील याची नोंद घ्यावी.

  १२. कोणतेही कारण न कळविता अॅप सेवा कधीही बंद करण्याचे सर्व अधिकार लेवा नवयुवक संघाकडेच राखीव असतील.

  १३. सर्व सुविधा युक्त अॅप फक्त वधू-वर किंवा त्यांचे आई वडील आणि संपर्कासाठी दिलेल्या पत्त्यांमधील व्यक्ति आणि त्यांनी दिलेले नंबर वरच घेऊ शकता. त्यांच्या व्यतिरिक्त इतर कोणीही घेतल्यास ते चालू ठेवणे किंवा कोणतीही पूर्व सूचना न देता ते बंद करण्याचे सुद्धा सर्व अधिकार लेवा नवयुवक संघाकडे राखीव असतील.

  १४. वरील सर्व नियम अटी व सूचना मी वाचल्या असून त्या सर्व मला समजलेल्या आहे तसेच सूचीचा वापर करतांना मी कोणतेही गैरवर्तन करणार नाही आणि नोंदणी अर्जामध्ये दिलेली सर्व माहिती सत्य असून खरे खोटेपणा विषयी वाद झाल्यास संपूर्ण जबाबदारी माझीच राहील त्याच प्रमाणे इतरांनी दिलेली माहितीची पडताळणी करणे ही जबाबदारी सुद्धा माझीच असेल त्यास लेवा नवयुवक संघ कोणत्याही परिस्थितीत जबाबदार राहणार नाही.

  १५. वेळोवेळी बदल होणार्‍या नियम व अटी मला मान्य राहतील आणि मी प्रत्येक सूचनांचे पालन करत राहील.

  १६. या वर्षी सुची स्पीड पोस्टद्व्यरे पाठवली जाणार आहे.

  १७. नोंदणी अर्ज भरण्याची अंतिम दिनांक १०.१०.२०२१.

  १८. सुची प्रकाशन दिनांक २५.१०.२०२१.